आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा:40 हजार रुपयांचा दंडही; महिलेचा विनयभंग करुन पतीला केली होती बेदम मारहाण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेचा विनयभंग करुन तिच्‍या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रामकिसन अप्‍पासाहेब लघाने (6, रा. पानरांजणगाव ता.पैठण) याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 40 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी ठोठावली.

विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणुन पीडित महिलेला देण्‍याचे आदेश दिले. तसेच पैठण प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेल्या दंडाची रक्कम सरकार दरबारी जमा करण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले. प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले.

रामकिसन लघाने याला 29 मे 2017 मध्‍ये पैठण प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी भादंवी कलम 354 अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच दंडातील रक्कमेतील 4 हजार रुपये पीडित महिलेला देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. याविरोधात आरोपीने सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते.

प्रकरणात पीडित विवाहीतेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, 23 जुलै 2014 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्‍या सुमारास पीडिता ही गाढेगाव गंगापुर शिवारातील शेतात काम करण्‍यासाठी जात होती. त्‍यावेळी रामकिसन लघाने याने मागुन येत पीडितेला घट्ट मिठी मारली. मी तुझ्यासाठी इतक्या लांबुन येतो, असे म्हणत असभ्य वर्तन केले. पीडितेने कशीबशी आपली सुटका करुन घेत थेट घर गाठले.

घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. पीडितेचा पती आरोपीला जाब विचारण्‍यासाठी गेला असता, संशयिताने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तु आमच्‍या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

या प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. पैठण प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी भादंवी कलम 354 अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच दंडातील रक्कमेतील 4 हजार रुपये पीडित महिलेला देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीने दाद मागितली. आता जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेली एक वर्षाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोपीला आता कोर्ट उठेपर्यंत शिक्षा देण्यात आली आणि आर्थिक दंड म्हणून चाळीस हजार रुपये जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावला.

बातम्या आणखी आहेत...