आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाची घोषणा:41 वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूरऐवजी होणार औरंगाबादेत

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

41 वे मराठवाडा साहित्य संमेलन आता देगलुरऐवजी औरंगाबादेत होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने हा निर्णय घेतला. हे संमेलन आता 25 व 26 सप्टेंबरला दोन दिवस होणार आहे.

41 वे मराठवाडा साहित्य संमेलन मार्चमध्ये देगलूर येथे घेण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे ते स्थगित करावे लागले होते. बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. त्यानंतर मराठवाड्यातील साहित्यप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येऊन ‘लोकसंवाद फाउंडेशन’ या त्यांच्या संस्थेतर्फे या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते.

त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्विकारण्यात आले. गुरुवारी (ता. दोन) साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व इतर पदाधिकाऱ्यांशी लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी समक्ष चर्चा केली. शासनाने घालुन दिलेले सर्व नियम पाळुन हे संमेलन घेण्याचे लोकसंवाद फाऊंडेशनने मान्य केले आहे. त्यानंतर फाऊंडेशनचे कार्यकर्ते कामाला लागले असुन त्यांनी बॅंकेत संमेलनाचे स्वतंत्र खातेही उघडले आहे. अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात आली. कोणताही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात साधेपणाने हे संमेलन कसे होईल यावर चर्चा करुन कमी खर्चात संमेलन घेण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच अगदी कमी दिवसांत 25 व 26 सप्टेंबरला दोन दिवस हे संमेलन घेण्याचे ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...