आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठावाडा साहित्य संमेलन:70 टक्के शेतकऱ्यांच्या जमीनी राष्ट्रीयकृत बँकाकडे गहाण; शेतकऱ्यांच्या बाजू घेतली तर तुम्ही अर्बन नक्सलाइड - परिसंवादातील सूर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोयाबीनचे दर का गडगडले याची सीबीआय चौकशी करा - नाट्य लेखक राजकुमार तांगडे

आज सरकारची तळी उचलणाऱ्यांनाच अर्थतज्ज्ञ म्हणून मानले जात आहे. तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी काहीच धोरण राबविले जात नाही. शेतकऱ्यांच्या 70 टक्के जमीनी राष्ट्रीयकृत बँकांकडे गहाण ठेवल्या गेल्या आहेत. तर शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्याला नकशलवादी विचारांच्या चौकटीचा शिक्का मारला जातो असा सूर रविवारी आयोजित परिसंवादातून उमटला. मराठवाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संत जनाबाई व्यासपीठावर 'आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्याता आलेला होता.

शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात कैलास तवर, नाट्य लेखक राजकुमार तांगडे, बालाजी मदन इंगळे, केदार काळवणे, नारायण शिंदे यांनी सहभाग घेतला होता. तांगडे म्हणाले की, सोयाबीनचे दर गडगडतात. परंतु, चार दिवसात अर्ध्यावर आलेल्या सोयाबिनचे दर का गडगडले याची सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे. मात्र एकएकट्या व्यक्तीची चौकशी केली जाते. राजकीय पक्ष गोंदळ उडवून देतात. आपल्याकडे प्रामाणिकपणाचा प्रचंड अभाव आहे. आज जातीच्या पलिकडे जावून विवेकाची कास धरण्याची गरज आहे. आज शेतकऱ्यांच्या 70 टक्के जमीनी राष्ट्रीयकृत बँकांकडे गहाण आहेत असेही तांगडे म्हणाले.

इंगळे म्हणाले की, अजून तरी शेतकऱ्यांचा आत्महत्येचा अधिकार हिरावून घेतला नाही. याबाद्दल शासनाचे आभारच मानायला हवे अशी उपहासात्मक टिपणी केली. सरकारच्या धोरण शून्यतेचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. तर स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय देईल असं धोरण नसल्याची खंत काळवणे यांनी व्यक्त केली. सरकारने सहकारी साखर कारखाने बंद पडण्याचे धोरणे आखले असून, तेच कारखाने राज्यकर्त्यांची मुले विकत घेतात अशी टिका शिंदे यांनी केली.

तवार यांनी शेतकरी गरीब कसा राहिलेच याचीच रणनीती सरकार करत असल्याची टीका केली. अध्यक्षीय समारोप मोहिते यांनी केला. ते म्हणाले की, बहुतांश वेळा अर्थतज्ज्ञ हे सरकारची तळी उचलणारेच असतात. शेतकऱ्यांच्या बाजू बोलणारे तर खलनायक ठरवले जाते नक्शली विचारांचा शिक्का मारला जातो असेही मोहिते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...