आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत कनेक्शन:दर्गा परिसरात 42 बेकायदा नळ तोडले ; संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी शहानूरमियाँ दर्ग्याजवळील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खालील बाजूने जाणाऱ्या दीडशे मिमी आणि दोनशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील ४२ अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. जलवाहिनीवर माेठ्या प्रमाणावर अवैध नळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक क्रमांक एकने ही कारवाई केली. या वेळी उपअभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता मिस्कीन, सुशील कुलकर्णी, सचिन वेलदोडे, होंदरणे, लाइनमन श्याम नवले आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...