आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात केली घोषणा:एनआयआरएफ रँकिंग वधारण्यासाठी 33 संशोधकांना 42 लाखांचे अनुदान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संशोधन व नवोन्मेष कक्ष अर्थात रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या नवीन संशोधन प्रकल्पांसाठी ३३ प्राध्यापकांना ४२ लाख २५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. एनआयआरएफ रँकिंग वधारण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नववर्षांसाठी ही घोषणा केली आहे.

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे विद्यापीठाने ‘रिसर्च अ‍ँड डेव्हलपमेंट सेल’ची स्थापन केली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांना या कक्षाचे संचालक केले. संशोधनात मागे पाडल्यामुळे गेल्यावर्षी एनआयआरएफ म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विद्यापीठ मागे होते. त्यामुळे डॉ. येवले यांनी संशोधन सुरू असले पाहिजे म्हणून हे अनुदान विद्यापीठ स्थानिक निधीतून देण्याचे जाहीर केले आहे. ‘संशोधन व नवोन्मेष’ समाजोपयोगी असावे या हेतूने संशोधन प्रकल्पांसाठी दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रस्ताव मागवले होते. एकूण ५५ प्रस्ताव आले होते.

त्यांचे प्रेझेंटेशन घेण्यात आले होते. त्यापैकी ३३ प्रकल्प अंतिमतः मंजूर केले आहेत. दुसऱ्या वर्षासाठी आणखी प्रस्ताव मागवल्याची माहितीही डॉ. येवले यांनी दिली. मंजूर ३३ प्रकल्पांना एकत्रित ४२ लाख २५ हजारांचा निधी देणार आहे. प्रेझेंटेशन झाल्यानंतर २२ प्रकल्प डॉ. येवले यांनी फेटाळले आहेत. मंजूर झालेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक १८ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रस्ताव आहेत. त्यांना २८ लाख १० हजारांचे अनुदान दिले जाईल. त्यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यांना ५ लाख १० हजार दिले जातील. मानव्य व सामाजिक शास्त्रे शाखेला ९ लाख ५ हजार अनुदान दिले जाईल. यात ९ प्राध्यापकांचे प्रकल्प मंजूर झाले.

अटल इन्क्युबेशनच्या माध्यमातून नवउद्योजकांना सहकार्य नवीन वर्षात जास्तीत जास्त कॉलेजांना स्वायत्तता देण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा वाढवण्याचा संकल्प डॉ. येवले यांनी केला आहे. डाॅ. येवले म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवणे, ‘स्किल बेस्ड एज्युकेशन’ व ‘स्टुडंट सेंट्रिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा नव्या वर्षाचा संकल्प आहे. अटल इन्क्युबेशनच्या माध्यमातून नवउद्योजकांना सहकार्य, पीएचडी प्रवेश प्रक्रिया (पेट) राबवणे, शहीद स्मारक, सिंथेटिक ट्रॅकची उभारणी करणार आहे.’

बातम्या आणखी आहेत...