आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय ज्युदो स्पर्धा:42 खेळाडूंना सुवर्णपदक; विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जिल्हा ज्यूदो संघटना व बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने बजाजनगर येथे झालेल्या शालेय जिल्ह्यास्तरीय ज्युदो स्पर्धेत स्नेहल भोसले, मृगजा गोमदे, प्रियंका जगताप, भक्ती लोमटे, श्रेया अंभोरे, नेहा जावळे, ऋषिकेश खोसरे, प्रतीक मुसळे, असीम शेख, मयूर साळे, हर्षवर्धन नागे यांच्यासह एकूण 42 खेळाडूंनी विविध गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेत 140 खेळाडूंचा सहभाग

श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रात झालेल्या स्पर्धेत 140 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी बाजीराव देसाई, वडगावचे सरपंच सुनील काळे, विजया शिरसाठ, हर्षदा शिरसाठ, श्रीकांत साळे, राजू राजपूत, सदानंद सवळे, ज्युदो संघटनेचे सचिव अतुल बामणोदकर, विश्वास जोशी, विश्वजीत भावे, भिमराज रहाणे, अशोक जंगमे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे तांत्रिक कमिटीचे सचिव दत्ता आफळे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, मेजर भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, प्रसन्न पटवर्धन यांनी अभिनंदन केले.

सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :

मुली - स्नेहल भोसले, श्रावणी गायकवाड, मृगजा गोमदे, प्रियंका जगताप, श्रुतकीर्ती खलाटे, भक्ती लोमटे, श्रेया अंभोरे, नेहा जावळे, वेदिका पोपटकर, रिया पाटील, मेगन देशपांडे, तनुजा माटे, वैष्णवी गिरे, आरती अधने, सुमेधा पठारे, स्वदीपा त्रिभुवन, ऋतुजा कोल्हे, श्रुती बमनावत, राधा साळुंखे.

मुले - चेतन समिंद्रे, ऋषिकेश खोसरे, प्रतीक मुसळे, असीम शेख, आदित्य तांबरे, मयूर साळे, हर्षवर्धन नागे, सुमित बोराडे, शंभू चोपडे, शिवम आनेराव, ऋषिकेश पुंड, समीर देवकर, तेजस सीरभैया, कार्तिक वरदे, शैल्य रत्नपारखी, ओजस बैग, संस्कार मुसळे, शाबेद पठाण, समीर शेख, पियुष चव्हाण, संभाजी देवकर, उझेर पटेल, ओम महाजन.

बातम्या आणखी आहेत...