आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या वतीने ९ ऑक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत मोहीम राबवून ६८ हजार ३२ जणांवर ४ कोटी २४ लाख ५,६०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. रस्त्यावर कचरा फेकणे, प्लास्टिक पिशवी विक्री, मास्कचा वापर न करणे, वेस्ट मेडिकल उघड्यावर टाकणे आदींवर कारवाई करण्यात आली असून, तेरा जणांवर एफआयआर दाखल केले आहे.
कोरोना महामारीत १ एप्रिल २०२० ते ३ एप्रिल २०२१ दरम्यान ही मोहीम राबवून मास्क न वापरणाऱ्या २८,४०८ नागरिकांवर १ कोटी ४२ लाख ४ हजार रुपये सर्वाधिक दंड वसूल केला आहे. एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी मोठी मदत झाली. ८,९३६ प्लास्टिक पिशवी विक्रेते आणि वापरकर्त्यांवर १ कोटी ५७ लाख ९०,६०० रुपये दंडात्मक कारवाई आणि १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या माध्यमातून ४३,७२० किलो प्लास्टिक जप्त करण्यात यश आले. कचरा टाकणे, कचरा जाळणे यासाठी २७,३२८ जणांवर ८९ लाख १७,६५० रुपये दंड केला.
अशाच प्रकारे बायोवेस्ट मेडिकलच्या ३१२ केसेस असून ८ लाख १९,५०० रुपये दंड, कन्स्ट्रक्शन वेस्टच्या २,२७३ प्रकरणांवर २० लाख ५९,१५० रुपये दंड, मांजा, पेंटिंग ९ केसेसवर ३८ हजार दंड, अनधिकृत क्लासेस पोस्टर्स लावणाऱ्या १४१ धारकांवर ४ लाख ४० हजार, वॉटर व्होलस ६०८ प्रकरणांत ६५ हजार ७००, झाडे तोडणाऱ्या १७ जणांवर ७१ हजार असा सर्व मिळून ४ कोटी २४ लाख ५,६०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.