आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीटीईचे निर्देश:परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट न देणाऱ्या 44 बीएड कॉलेजांना प्रवेश देताच येणार नाही

औरंगाबाद / विद्या गावंडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट (कामगिरी मूल्यांकन अहवाल) न करणाऱ्या बीएड, डीएलएड महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे निर्देश नॅशनल काैन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने दिले आहेत. आदेश देऊनही हा रिपोर्ट न पाठवणाऱ्या आैरंगाबाद जिल्ह्यातील ४८ पैकी ४४ काॅलेजांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. परतु, खासगी संस्था याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा उच्च शिक्षण विभागाकडून अशा बीएड कॉलेजांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना नॅक मूल्यांकन अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने बीएड कॉलेजांतही होणारा मनमानी कारभार आणि माल प्रॅक्टिस, गल्लीबोळात भरणाऱ्या महाविद्यालयांना आळा घालणे आणि पारदर्शकतेसाठी परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट करणे अनिवार्य केले आहे. यात एनसीटीईचाच ८० टक्के अभ्यासक्रम लागू आहे. औरंगाबादेत एकूण ४८ बीएड कॉलेज असून त्यापैकी दोन अनुदानित, तर दोन शासकीय आहेत. इतर ४४ खासगी आहेत. मात्र, यापैकी फक्त औरंगाबाद शासकीय बीएड कॉलेज, अंबाजोगाई शासकीय बीएड कॉलेज, डीएसआर आणि खुलताबाद या चार कॉलेजांनी परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट सादर केला आहे. प्रवेशासाठी ही प्राथमिक अट आहे. त्यामुळे आता उर्वरित ४४ कॉलेजांना अहवाल सादर केल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नाही. तसेच कारवाईलादेखील सामोरे जावे लागेल असे उच्च शिक्षण विभागाने म्हटले आहे.

महाविद्यालयांना अशी द्यावी लागते माहिती या परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्टची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. यात विद्यार्थी संख्या, इमारतीसंबंधीची माहिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व भौतिक सुविधा, स्टाफ, जिओ टॅक फोटो, क्लासरूम फोटो, फायर ऑडिट रिपोर्ट, कॉलेजची जागा स्वत:ची की खासगी, प्राचार्य फोटो, मान्यता असल्याची सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात.

अहवाल (पार) बंधनकारक एनसीटीईने सर्व कॉलेजांना परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट अनिवार्य केला आहे. तसेच कॉलेजांना तो करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जे काॅलेज अहवाल सादर करणार नाहीत त्यांना प्रवेश देता येणार नाही. केवळ चार कॉलेजांनी अहवाल सादर केले. आता बीएड कॉलेजांचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल. -डॉ. सतीश देशपांडे, उच्च शिक्षण सहसंचालक

बातम्या आणखी आहेत...