आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 जणांना हृदयविकाराचा धोका:ग्लोबल फाउंडेशनच्या शिबिरात 44 जणांना रक्तदाबाचे निदान ;225 जणांची तपासणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्दिकी वेल्फेअर सोसायटी, ग्लोबल मेडिकल फाउंडेशन आणि पॅसिफिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हर्सूल येथील करीमनगरात आरोग्य तपासणी शिबिर झाले. त्यात २२५ जणांची तपासणी झाली असून ४४ जणांना रक्तदाब असल्याचे तर ३५ जणांना हृदय रोगाचा धोका असल्याचे अाढळून आले. सर्वांना तपासून मोफत उपचारही देण्यात आले.

शिबिरात ईसीजी आणि बीपी प्रामुख्याने तपासण्यात आला. बीपीच्या आजारातूनच अनेक आजारांना निमंत्रण मिळते, असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. इश्तियाक अन्सारी यांनी सांगितले. त्यामुळे रक्तदाबावर कायम नियंत्रण ठेवायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. निवन, डॉ. सुलेमान खान, डॉ. वाणी साळुंके, अमीन पठाण, नेहाल देशमुख यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. सचिव मसिऊद्दीन सिद्दिकी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...