आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:विद्यापीठातील 44 टक्के विद्यार्थिनींना रक्तक्षय, तर 2.65 टक्के मुलींमध्ये ‘सिव्हिअर अॅनिमिया’ असल्याचे निदान

छत्रपती संभाजीनगर / विद्या गावंडे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४४ विद्यार्थिनींना रक्तक्षय असल्याचे दिसून आले. त्यापैकी २.५६ विद्यार्थिनींना ‘सिव्हिअर अॅनिमिया’ असल्याचे निदान झाले आहे. या विद्यार्थिनींनी डाॅक्टरांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात आयोजित शिबिरात ३७७ मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यात एकूण ४४ टक्के मुलींना रक्तक्षय असल्याचे दिसून आले आहे, तर ५६.७६ टक्के मुलींचे हिमोग्लोबिन नॉर्मल असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. बी. सोमवंशी यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात शिबिर झाले. औरंगाबाद ऑबस्ट्रिक्स अ‍ँड गायनेकॉलॉजिकल सोसायटी यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. या वेळी अधिसभा सदस्य डॉ. योगिता होके पाटील यांची उपस्थिती होती.

आहार कसा असावा याबाबत केले मार्गदर्शन : या सर्व विद्यार्थिनींना आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली. आहाराचे फायदे-तोटे, आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

आहारात लोहाची कमतरता तरुणींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे. त्याचे कारण आहारातून जे लोह मिळायला हवे ते मिळत नाही. फास्ट फूड, जंक फूडमुळेे फक्त पोट भरते, रक्त वाढवणारे घटक त्यात नसतात. सकस आणि पौष्टिक आहाराची कमतरता, मासिक पाळीतील अडचणी याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचाही हा परिणाम आहे. - डॉ. सई पाटील, आरोग्य अधिकारी, ग्रामीण आरोग्य प्रकल्प

बातम्या आणखी आहेत...