आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर अधिसभेसाठी 45 अर्ज:राष्ट्रवादीचे 10 जागांसाठी 27 नामांकन, जुन्या 8 चेहऱ्यांवर होणार शिक्कामोर्तब

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधरमधून ४५ नामांकन दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उत्कर्ष पॅनलने १० जागांसाठी १९ जणांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित १८ अर्जांत अपक्ष, शेकापच्या उमेदवारांचा समावेश आहे. उत्कर्षच्या १८ पैकी १० उमेदवार नक्की झाले असून त्यात ८ चेहरे जुनेच असण्याची दाट शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात पदवीधर अधिसभेतून निवडून येणाऱ्या १० जागांसाठी २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. खुल्या प्रवर्गातून-५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, इतर मागास आणि महिलांमधून प्रत्येकी एक उमेदवाराची निवड केली जाणार आहे. २७ ऑक्टोबरपासून अर्जांची सुरूवात झाली होती. १ नोव्हेंबरला ७ अर्ज आले होते. २ नोव्हेंबरला ३८ अर्ज दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत ४५ नामांकन दाखल झाले आहेत. यात खुल्या प्रवर्गातून सर्वांधिक २२,महिलांचे-३, अनूसुचित जाती-२, अनूसूचित जमाती-१, इतर मागास प्रवर्गातून-५ तर भटके विमुक्तांच्या एका जागेसाठी तब्बल १२ अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या उत्कर्ष पॅनलने सर्व संभाव्य उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत. त्यात ८ चेहरे जुनेच नक्की केली जातील असे चिन्हे आहेत. ११ नोव्हेंबरला नामांकन मागे घेण्याची मुदत आहे.

‘उत्कर्ष’चे १० जागांसाठी १८ जणांचे नामांकन

उत्कर्षच्या १८ इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहेत. त्यात मावळते व्यवस्थापन परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी डॉक्टर्स आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. हर्षा काळे यांनीही नामांकन दाखल केले आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातून शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे निकटवर्तीय हरिदास सोमवंशी यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. भारत खैरनार, चंद्रकांत चव्हाण, रमेश भुतेकर, जहूर शेख, विजय पवार, संभाजी भोसले, पंडित तुपे यांनीही नामांकन दाखल केले आहेत. पण यांच्यापैकी भारत खैरनार, जहूर शेख, रमेश भुतेकर यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महिलांमधून मीनाक्षी शिंदे नक्की आहे. प्रा. संभाजी भोसले आणि दत्तात्रय भांगे यांच्यापैकी एक भटक्या विमुक्तांमधून फायनल होण्याची शक्यता आहे. यंदा भटक्यातून विजयी होणाऱ्यांना व्यवस्थापन परिषदेत जाणे सुकर होणार आहे. महेश उबाळे, अक्षय बाहेती, योगिता पाटील यांनीही नामांकन दाखल केले आहेत. इतर मागास वर्गातून सुभाष राऊत, राजीव काळे, सय्यद सज्जाद एकबाल यांच्यापैकी सुभाष राऊत किंवा राजीव काळे यांना उमेदवारी मिळेल.

विमुक्त जातीमधून हर्षा काळे यांच्या व्यतिरिक्त संजय काळबांडे, विठ्ठल गडदे, संभाजी भोसले, रखमाजी कांबळे यांचे अर्ज आहेत. अनुसूचित जमातीमधून सुनिल निकम तर अनुसूचित जातीतून सुनील मगरे यांनाच उमेदवारी मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...