आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहार:साडेचार लाख विद्यार्थ्यांना 15 मार्चपासून मिळणार पोषण आहार; रविवारीही होणार वाटप

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शालेय विद्यार्थ्यांना अद्यापही ५० टक्के पोषण आहाराचे धान्य वाटप करणे बाकी असल्याने १५ मार्चपासून पोषण आहार वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत साडेचार लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार असल्याची माहिती पोषण आहार विभागाचे अधिकारी भाऊसाहेब देशपांडे यांनी दिली.
कोरोनामुळे पोषण आहार शिजवणे बंद होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उपस्थिती वाढवण्याच्या दृष्टीने शाळांसह, पालकांकडून पोषण आहार शिजवून देण्याची मागणी जोर धरत असल्याने अखेर राज्य सरकारने शाळेत पोषण आहार शिजवून देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांचे धान्य वाटप झाले नाही. ते वाटपासाठी किमान ८-१० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

त्यानंतर शाळेत पोषण आहार शिजवून देण्यासाठी धान्य वाटपाला सुरुवात होईल. त्यासाठी किमान १५ दिवस लागतील. औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हजार ७७ शाळांमधील ४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांचे १५४ दिवसांचे धान्य वाटपातील ४ हजार टन तांदूळ शाळांमध्ये पोहोचणे बाकी आहे. त्यासाठी साधारणपणे दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर शाळांत शिजवण्याच्या पोषण आहाराचे धान्य वाटप होईल. त्याला दोन आठवड्यांचा कालावधी तरी लागेल. त्यामुळे रविवारीदेखील पोषण आहारासाठी धान्य वाटप केले जाणार असल्याचे पोषण आहार अधीक्षक देशपांडे म्हणाले.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळतो आहार
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी, अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० कॅलरी व १२ ग्रॅम प्रोटीनयुक्त दुपारचे मध्यान्ह भोजन, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरी व २० ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...