आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:मराठवाड्यात सोमवारी आढळले 45 नवीन रुग्ण, हिंगोलीत आणखी 24 पॉझिटिव्ह; नांदेडमध्ये 3 नवे रुग्ण, 4 बेपत्ता

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत पत्रकारासह १५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

हिंगोलीत सोमवारी रात्री उशिरा २४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. यात राज्य राखीव दलाचे २३ जवानांसह एका  नर्सचा समावेश आहे. आता हिंगोलीतील रुग्णसंख्या ७६ झाली असून पैकी ७० रुग्ण जवान आहेत. ते मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते. हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवले होते. १ व २ एप्रिलला ३२ जण पॉझिटिव्ह आले होते.

नांदेड : ४ कोरोनाग्रस्तांचा शोध सुरू

शहरात सोमवारी कोरोनाचे ३ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली. त्यापैकी ३ जण मृत झाले असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात चार कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. 

लातूर : उदगीरमध्ये तीन नवे रुग्ण

सोमवारी उदगीर येथील आणखी तीन रुग्ण सापडले. येथील रुग्णसंख्या १३ वर पोहोचली आहे. येथील मृत महिलेच्या कुटुंबांतील आणि संपर्कातील १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामध्ये सोमवारी तिघांची भर पडली

बीड : शून्य कायम, नवा रुग्ण नाही : बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सोमवारीही आलेल्या अहवालांत जिल्ह्यात एकही रुग्ण नव्याने आढळून आलेला नाही.

जालना : ६ जणांची प्रकृती स्थिर

कोरोनाबाधित एसआरपीएफचे ४ जवान, परतूर तालुक्यातील युवक व भोकरदन तालुक्यातील युवतीवर उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे. 

परभणी : १९ संशयित दाखल

येथे सोमवारी १९ संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. ९३४ संशयितांपैकी ८९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

औरंगाबादेत पत्रकारासह १५ जण काेराेना पाॅझिटिव्ह

साेमवारी १५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने औरंगाबादेतील एकूण रुग्णसंख्या २९७ झाली आहे. यात एका पत्रकाराचा व त्याच्या आईचा समावेश आहे. बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय काेराेनाबाधित व्यक्तीचा रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास न्यूमोनिया, कोविड, श्वसनविकाराने घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया, मधुमेहाचाही आजार होता.  शहरातील बळींची संख्या १० झाली आहे. २५ जण काेराेनामुक्त झाले आहेत. कोरोनाबाधित एकूण रुग्णांमध्ये ५६ टक्के पुरुष तर ४४ टक्के महिला आहेत.

बातम्या आणखी आहेत...