आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जिन्सी पोलिसांची कारवाई:काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 45 क्विंटल गहू, तांदूळ पकडला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारा रेशनचा ४५ क्विंटल ६० किलो गहू, तांदूळ जिन्सी पोलिसांनी पकडला. मंगळवारी पहाटे पोलिसांनी शेख कलीम शेख सलीम (२७, रा. नेहरूनगर) आणि मोईज खान जमाल खान (२१, रा. किराडपुरा) यांना अटक केली. जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांना दाेघे मदनी चौकाजवळील एका घरात रेशन धान्याचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या सूचनेनुसार सायंकाळी ७.३० वाजता छापा मारला. तेव्हा शासनाचा लोगो असलेले ३० रिकाम्या गोण्या, तांदूळ भरलेल्या ११२ गोण्या आणि गव्हाच्या दोन गोण्या असा ४५ क्विंटल ६० किलोचा साठा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला. सर्व धान्य रेशन दुकानदार, लाभार्थींकडून विकत घेऊन विक्री करत असल्याची कबुली दोघांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...