आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:अब्दीमंडीत विभक्त झालेल्या 45 वर्षीय पतीची आत्महत्या

दौलताबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्दीमंडी येथील रहिवासी प्रकाश कडुबा भिवसाने (४५) यांनी रविवारी घरात आत्महत्या केली. ते मोलमजुरी करीत होते. रविवारी सकाळी त्यांची बहीण त्यांना उठवण्यासाठी गेल्यानंतर वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद येत नसल्याने तिने खिडकीतून डोकावल्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय गिते, पोलिस कर्मचारी एल. एस गोरे, सुदर्शन राजपूत यांनी त्यांना गळफासावरून उतरवून घाटीत दाखल केले. त्यांच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी आहे.प्रकाश यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून मुलांसह विभक्त राहत होती. या प्रकरणाचा तपास दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...