आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या क्रमांकावर घसरण:2 कंपन्या बाहेर गेल्याने मद्यातून 450 कोटी महसूल घटला, उत्पादन शुल्कातून औरंगाबाद विभागाला 3,937 कोटींचे उत्पन्न

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यविक्रीच्या माध्यमातून राज्याला सर्वाधिक कर मिळवून देणारे औरंगाबाद यंदा पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. कोरोनाचा फटका तसेच एबीडी डिस्टिलरी व सिग्रामचा (परनॉड रिकॉड) रॅडिको सोबतचा करार संपवून दुसऱ्या जिल्ह्यात उत्पादन सुरू केल्याने महसूलात ४५० कोटींची तफावत आली. तरीही उत्पादन शुल्क विभागात औरंगाबाद जिल्ह्याने यंदा राज्याच्या तिजोरीत ३,९३७ कोटी ९८ लाखांचा महसूल जमा केला. यंदा हे उद्दिष्ट ५ हजार २५७ कोटी ३० लाख आहे. गोदावरीचे पाणी अनुकूल असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मिती केली जाते. शिवाय, मद्यसेवनाचे प्रमाणदेखील वाढल्याने राज्याच्या तिजोरीत औरंगाबाद उत्पादन शुल्क विभाग सर्वाधिक महसूल जमा करणारा ठरला. मात्र, हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या जिल्ह्याच्या मद्य क्षेत्राला कोरोनाने मोठा फटका दिला. त्यातून सावरत यंदा समाधानकारक निर्मिती व विक्री झाली. बिअर पिण्याचे प्रमाण वाढल्याने महसूल बऱ्यापैकी मिळत आहे. जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला असला तरी येणाऱ्या वर्षात हेच प्रमाण पुन्हा ६.८१ टक्क्यांनी वाढेल. .

एबीडी डिस्टिलरी, सिग्रामचा रॅडिकोशी करार संपल्याचेही कारण
- दरवर्षी राज्याच्या गंगाजळीत औरंगाबाद विभाग सर्वाधिक महसूल जमा करतो. राज्याच्या एकूण उत्पादनात मद्यामुळे औरंगाबाद सातत्याने अग्रस्थानी राहिले. परंतु एप्रिल, मे, जून २०२१ मध्ये मुंबई, पुणे व ठाणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व मद्यविक्रीच्या वेळा कमी गेल्याने या विभागाच्या महसुलात यंदाच्या वर्षात अपेक्षित वाढ झाली नाही.
- एप्रिल ते जून हा कालावधी बिअर विक्रीसाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. मात्र, त्याच दरम्यान कोरोनामुळे बिअरचे सेवन कमी झाले व त्याचा परिणाम महसुलावर झाला.
- एबीडी डिस्टिलरीने २०२० मध्ये तर सिग्रामने (परनॉड रिकॉड) एप्रिल २०२१ मध्ये रॅडिको एन. व्ही. सोबतचा करार संपवून उत्पन्न बंद करत ते अन्य जिल्ह्यात हलवले.

असा मिळाला महसूल
२०२०- २०२१
- ३ हजार ६८२ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक कमी ९ कोटी १३ लाख तर मार्चमध्ये ६०६ कोटी ३९ लाख.
२०२१--२०२२
- ३, ९३७ कोटी इलाख.
एप्रिलमध्ये ७० कोटी २९ लाख. सर्वाधिक कर मार्चमध्ये ६४५ कोटी ७९ लाख रुपये.

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ८८% उद्दिष्ट पूर्ण
२०२१-२२ मध्ये उत्पादन शुल्कचे औरंगाबादसाठी ४ हजार ४४७ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८८ टक्के पूर्ण झाले, तर २०२२ ते २३ या वर्षासाठी
५ हजार २५७ कोटी ३० लाख रुपयांचे उद्दिष्ट असून एकट्या एप्रिल महिन्यात ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२२ मध्ये ३५७ कोटी ९१ लाखांचा महसूल मिळाला. गतवर्षी एप्रिल महिन्यात ७० कोटी २९ लाख मिळाले होते. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने महसूल वाढेल, असे अधीक्षक सुधाकर कदम म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...