आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसाहत:जजच्या बंगल्यांसाठी 46 झाडे तोडणार ; स्नेहनगरातील शासकीय वसाहतीत आहेत झाडे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्नेहनगरातील शासकीय वसाहतीत न्यायमूर्तींची दोन निवासस्थाने बांधण्यासाठी तब्बल ४६ झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यावर मनपाने जाहीर प्रगटन देऊन १० जूनपर्यंत नागरिकांचे आक्षेप मागवले आहेत. स्नेहनगरातील ४६ झाडांशिवाय इतर ८ खासगी मालमत्ताधारकांनी ११ झाडे तोडण्याची परवानगी मनपाकडे मागितली आहे. डॉ. नीरज चौधरी, एन-३, सह्याद्री हिल्स शिवाजीनगर, ज्योतीनगर, टिळकनगर, पहाडसिंगपुरा, हर्सूल (प्रत्येकी १ झाड) कृष्णकुंज सोसायटी, सातारा परिसर (३ झाडे), दशमेश रोड उस्मानपुरा (दोन झाडे) येथील झाडांचा समावेश आहे. याबाबत आक्षेप असेल तर मनपाच्या उद्यान विभागाकडून सुनावणी घेतली जाते. अर्जदारांचा मुद्दा हिताचा वाटल्यास झाडे तोडण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते. मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील म्हणाले, एक झाड तोडण्याची मागणी मंजूर झाल्यास संबंधितांकडून दहा झाडे लावण्याचे हमीपत्र भरून घेतले जाते. एका झाडासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरून घेतली जाते. तीन वर्षे झाडाचे संगोपन केल्यानंतर ती रक्कम परत केली जाते. शासकीय कार्यालयासाठी अनामत रक्कम भरण्याची तरतूद नाही.

बातम्या आणखी आहेत...