आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:दीक्षितांच्या प्रेरणेतून लायन्सचे 46 वे प्लास्टिक सर्जरी शिबिर ; पाच दिवस चालणार उपक्रम

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेले असताना जोरदार पावसामुळे डॉ. शरद दीक्षित हॉटेलमध्ये अडकले. त्याचवेळी लायन्सची बैठक तिथे सुरू होती. या दरम्यान घडलेल्या संवादातून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे बीजारोपण झाले. औरंगाबादेत १९७६ मध्ये दोन रुग्णांच्या शस्त्रक्रियेपासून शिबिराला सुरुवात झाली. आतापर्यंत १३ हजार ४३६ जणांवर मोफत शस्त्रक्रिया करून हजारोंचे आयुष्य या शिबिराने उजळले आहे. यंदाचे शिबिर १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अग्रवाल यांच्यासह एमजीएम रुग्णलयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिबिराचे प्रकल्पप्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपप्रमुख प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, लायन्सचे कल्याण वाघमारे उपस्थित होते. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लायन्स या शिबिराशी एमजीएम अनेक वर्षांपासून जोडले गेले आहे. यानिमित्ताने सामाजिक उपक्रमात आमचाही हातभार लागतो. पहिल्या दिवशी तपासणी झालेल्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया एमजीएममध्ये केल्या जातील. यंदा ५०० हून अधिक शस्त्रक्रिया पार पाडण्याचा मानस आहे.

बातम्या आणखी आहेत...