आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचा फैलाव सुरू:शहरात डेंग्यूचे 47 रुग्ण

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारेगाव, सातारा-देवळाई परिसरातही डेंग्यूचा फैलाव सुरू झाला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत शहरात डेंग्यूचे ३८ रुग्ण होते. गुरुवारी यात ९ रुग्णांची वाढ झाली आहे. नारेगावात ४ जण पॉझिटिव्ह, सातारा-देवळाई परिसरात ३ रुग्ण संशयित आढळले आहेत.

ताप, सर्दी, खोकला यासह घशावर सूज येणे, जेवण न जाणे, हातपाय ठणकू लागणे आदी लक्षणे मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेपर्यंत डेंग्यूचे ३८ संशयित तर १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. गुरुवारी मनपाला प्राप्त अहवालानुसार खासगी रुग्णालयात सातारा-देवळाईतील ३ जण दाखल असून घाटीत डेंग्यूचे ६ पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नारेगावमधील चार, खाराकुवा-१, मुकुंदवाडी-१ एक याप्रमाणे रुग्ण आहेत.

अबेटिंगची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक
शहरात औषध व धूर फवारणी, अ‍बेटिंग, साचलेल्या पाण्यात ऑइल सोडण्याचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. हे काम होत नसल्यामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...