आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनोळखी वेबसाइटवर पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाची सायबर गुन्हेगारांनी ४७ हजार ४६४ रुपयांची फसवणूक केली. अदित असे त्यांचे नाव असून ते आयपीएस अधिकारी अरविंद चावरिया यांचे पुत्र आहेत. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.२६ वर्षीय अदित २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी होते. त्या वेळी त्यांना लिंक असलेला टेक्स्ट मेसेज प्राप्त झाला. पॅनकार्ड अपडेट न केल्यास एचडीएफसी बँकेचे खाते तत्काळ बंद केले जाईल, असे त्यात नमूद होते. त्यावर अदित यांनी क्लिक केले असता त्यात बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आले.
हा फॉर्म भरल्यानंतर त्यांना ओटीपी आला. त्यांनी फॉर्ममध्ये ओटीपी टाकताच त्यांच्या बँक खात्यातून ४७ हजार ४६४ रुपये तत्काळ दुसऱ्या खात्यात वळते झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांच्या तपासात हे पैसे झारखंड राज्यातील कामेश्वर मंडळ गावच्या दीपक मंडलच्या बँक खात्यात वळते झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक राजश्री आडे तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.