आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय अधिकारी, कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग क अथवा ड पदावर अनुकंपा तत्त्वावर तत्काळ सेवेत घेण्याची तरतूद आहे. यानुसार जिल्हा परिषदेकडून भरती करण्यात आली होती. यामध्ये परिषदेच्या आस्थापनेवर अनुकंपामधून भरण्यात आलेल्या एकूण ७२ जणांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून गुरुवारी बोलावण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी अनुकंपा तत्त्वावर वर्ग चार पदांवर कार्यरत असलेल्या ४८ जणांना वर्ग तीनमध्ये पदस्थापना दिली.
या ७२ जणांपैकी एक मृत झाला असून एक कर्मचारी अनुपस्थित होता, तर दोघे अपात्र ठरले. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी उपस्थित ६८ उमेदवारांपैकी ४८ जणांना पदस्थापना देऊन उर्वरित उमेदवारांना वेटिंगवर ठेवले आहे. ही प्रक्रियाही लवकरच राबवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्य तुपे यांनी या वेळी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.