आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:48.5 टक्के कॉलेजच्या तरुणी मोबाइल वापरतात माहितीसाठी

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाइल फोन काही वर्षांपूर्वी केवळ व्यक्तीशी संवाद साधण्याचे साधन होता. आता जगभरात इतर गरजांप्रमाणेच मोबाइल फोनही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. मात्र आजही मुलींना कशाला हवा मोबाइल फोन, असा विचार करणारेदेखील आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणी मोबाइल फोनचा अधिकाधिक वापर नेमका कशासाठी करतात हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने शहरातील महाविद्यालयांत शिकणाऱ्या १०७ तरुणींचे सर्वेक्षण केले.

यातून ४८.५ टक्के तरुणी मोबाइलचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी करतात, तर ४९ टक्के तरुणी या ‘सर्च’ करण्यासाठी वापरतात. फोनचा मूलभूत वापर ‘काॅल’ करण्यासाठी केला जातो. २७ टक्के महाविद्यालयीन तरुणी मोबाइलचा ‘काॅल’ करण्यासाठी वापर करीत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनाकाळात ऑनलाइन क्लासचा अधिक महत्त्व आले होते. ऑनलाइन शिक्षणासाठी १७.८ टक्केच तरुणी मोबाइलचा उपयोग करतात. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे असे बोलले जाते, पण केवळ १०.९ टक्केच तरुणी सोशल मीडियासाठी मोबाइलचा वापर करतात. ११ टक्के तरुणी मोबाइलमधील मेसेज फीचर वापरतात, तर केवळ ७ टक्के तरुणी नोटपॅड या फीचरचा वापर करतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...