आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी उत्तीर्ण तंत्रनिकेतन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून, आता 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष कोलमडणार?
आतापर्यंत ही चारवेळा मुदतवाढ झाली असून, यामुळे प्रवेशावर परिणाम होऊन शैक्षणिक वर्षही कोलमडण्याची शक्यता आता तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. या मुदतवाढीसंदर्भातील सूचनापत्र याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शुक्रवारी जाहिर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची टांगती तलवार
सीबीएसई दहावीच्या निकालामुळे तंत्रनिकेतनसाठी राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चिती करणे या प्रक्रियेला वेग आला होता. तसेच यंदा दीडपट अर्ज आल्यामुळे आता पुन्हा मुदवाढ होणार नाही. प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होईल. अशी अपेक्षा महाविद्यालयांना होती. परंतु आता पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने पुढील प्रक्रिया पुन्हा लांबणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या कॅपशिवाय जागांसाठी ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत सुरु ठेवल्या जातील. 11 ऑगस्टपर्यंत ई स्क्रुटनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्चिती होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅपव्यतिरिक्त विचारात घेतले जातील.
गुणवत्ता यादी 13 ऑगस्टला
सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता यादी 13 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. याद्यामध्ये तक्रार असल्यास त्या सादर करण्यासाठी 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान वेळ देण्यात आला आहे. अंतिम गुणवत्ता यादी 18 ऑगस्टला जाहिर करण्यात येईल. यासंदर्भातील अधिकची माहिती https://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थी काही अडचणी आल्यास 8698781669 या हेल्पलाइन नंबरवर मदत मागू शकतात. असेही तंत्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. तर आता मुदवाढीचे कारण काहीच नव्हते. परंतु नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या रोबोटीक्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्ससारखे काही नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. त्यास एआयसीटीईची मान्यता आवश्यक असल्याने कदाचित ही मुदतवाढ देण्यात आली असावी असे शिक्षकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.