आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अतिवृष्टीने मराठवाड्यात 5, 87000 हेक्टरचे नुकसान

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात अतिवृष्टीने पाच लाख ८७ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार ८०७ कोटींचा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाने शासनाला पाठवला आहे. पावसाने नांदेड, हिंगोली, जालना बीड, लातूर जिल्ह्यात प्रचंड तर औरंगाबाद, परभणी, उस्मानाबादमध्ये काहीच नुकसान झालेले नाही, असे अहवालात म्हटले आहे.

आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या १२३ टक्के जास्त म्हणजे ५७३ मिमी पाऊस झाला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांचे किती हेक्टरचे नुकसान झाले. त्यांच्यासाठी किती रुपये भरपाईचा प्रस्ताव आहे, याचा तपशील असा. नांदेड - ६ लाख ९९ हजार ९६७ शेतकरी, चार लाख ९७ हजार ४४३ हेक्टर - ६७७ कोटी. हिंगोली - १ लाख ९ हजार ६४२, ८८३०१ हेक्टर - १२७ कोटी. लातूर २०२६ शेतकरी, १६६१ हेक्टर, दोन कोटी २६ लाख. जालना ४३ शेतकरी - १३ हेक्टर, बीड - १६७ हेक्टर, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...