आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची झाली चाळणी:एमआयटी कॉलेजच्या मुख्य रस्त्यावर 5 फूट लांब खड्डा ; नागरिकांना माेठा मनस्ताप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड बायपास रोडवरील सातारा गावात जाण्यासाठी, एमआयटी महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा फूट लांबीचा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना येण्या-जाण्यासाठी अवघ्या दोन फुटांचा सोयीचा रस्ता बाकी आहे. पावसाळा सुरू होताच सातारावासीयांना माेठ्या अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. सातारा-देवळाई भागातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवरही खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना माेठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एमआयटीकडून सातारा गावासह खंडोबा मंदिरात, विविध महाविद्यालयांत जाण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. मात्र, एमआयटी महाविद्यालयालगत उड्डाणपुलाचे काम चालू असून सर्व्हिस रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. एवढेच नव्हे तर साताऱ्याकडे जाण्यासाठी वळण घेतल्यानंतरच ५ ते ६ फूट लांबीचा खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी पंधरा फुटांचा रस्ता असून खड्ड्यामुळे वाहनधारकांना अवघ्या दोन फुटांचा रस्ता येण्या-जाण्यासाठी शिल्लक राहिला आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली असून रस्त्याचे पॅचवर्क किंवा सिमेट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी नागरिकांसह विद्यार्थ्यांकडूनही होत आहे.

बातम्या आणखी आहेत...