आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा संत शिरोमणी सावता मंडळाच्या अखंड हरिनाम रौप्यमहोत्सव सप्ताहाची बुधवारी सांगता झाली. याप्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सजवलेले रथ, घोडे, उंट अन् महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत पावली खेळली. या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण सप्ताहात पाच लाखांचा खर्च झाला. काल्याच्या कीर्तनात उपस्थित तीन हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले. संत सावता मंदिरापासून सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. सजवलेल्या बैलजोडीच्या एका रथात विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती, संत सावता महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती.
दुसऱ्या सजवलेल्या रथात नाशिकचे रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ विराजमान होते. मिरवणुकीत पोतदार हरेश्वर माळी, विनावादक सांडू बनसोडे यांच्यामागे घोडेस्वार आणि उंटस्वार हातात भगवी पताका घेऊन उभे होते. त्या पाठोपाठ सावता भजनी मंडळ मृदंग, पखवाजाच्या साथीने ज्ञानोबा माउली तुकाराम...म्हणत टाळ वाजवत होते. महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर काही महिलांनी भजन गात पावली खेळण्याचा आनंद लुटला.
जवळपास पाचशे जणांचा मिरवणुकीत सहभाग होता. मिरवणूक सावता मंदिर ते हनुमान चौक, दहिहंडे गल्ली, अहिल्याबाई चौक, कृष्ण मंदिरमार्गे पुन्हा सावता मंदिरापर्यंत निघाली होती. या वेळी सोमनाथ गोटे, किशन नवपुते, मदन नवपुते, रवी तावडे, सुखदेव धोत्रे, ज्ञानेश्वर जाधव, नवनाथ नलावडे, कारभारी गोटे, मनोहर लोंढे, नीलेश कावडे आदींची उपस्थिती होती.
गेल्या आठ दिवसांपासून वातावरण भक्तिमय गेल्या आठ दिवसांपासून संत शिरोमणी सावता मंडळाच्या अखंड हरिनाम रौप्यमहोत्सवामुळे वातावरण भक्तिमय झाला होता. ग्रहण असल्याने एक दिवस वाढला. काल्याच्या कीर्तनानंतर तीन हजार भाविकांना पोळी, वरणाचा महाप्रसाद वाटप केला. संपूर्ण सप्ताहात पाच लाखांचा खर्च झाला. सुनील गाजरे, अध्यक्ष, संत शिरोमणी सावता मंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.