आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​रेल्वेसेवेत अडथळा ठरणाऱ्या सवलती बंद होणार:रेल्वे समितीच्या 5 सदस्यांचे आधी पर्यटन, नंतर आढावा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात रेल्वेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रवासी सेवा आणि सुविधांचा आढावा घेणारी पाचसदस्यीय समिती साेमवारी शहरात आली. या सदस्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. नंतर रेल्वेस्थानकाच्या व्हीआयपी हॉलमध्ये पत्रकारांशी बोलताना समिती सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा गौरव केला. रेल्वेतील सवलतींमुळे सेवेवर मोठा परिणाम होत असून त्या बंद करण्याचे धोरण असल्याचे समितीचे सदस्य सुनील राम यांनी सांगितले.

समितीचे चेअरमन केरळ येथील पी. के. कृष्णदास आहेत. सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र फडके, कैलास वर्मा, विभाश्री अवस्थी, अभिजित दास आदींचा समावेश आहे. ही समिती मंडळनिहाय आढावा घेते. प्रवाशांसाठी कुठल्या सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे आहे यासंबंधी रेल्वे बोर्डाकडे शिफारस केली जाते. रेल्वे बोर्ड व्यावहारिकता तपासून समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांना प्राधान्य देते. नांदेड मंडळातील समिती सदस्यांच्या दौऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकापासून सुरुवात करण्यात आली. स्थानकाची पाहणी केल्यानंतर पाचही सदस्य जालनासाठी रवाना झाले. भाजपचे माजी महाराष्ट्र संघटनमंत्री तथा बेटी बचाव क्षेत्रात कार्यरत डॉ. राजेंद्र फडके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रेल्वेचा तोटा भरून निघेना कोविड काळातील रेल्वेचा तोटा अद्याप भरून निघालेला नाही. त्यामुळे समितीने तीन वेळा रेल्वे बोर्डाकडे शिफारस करूनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. देशात १२ कोटी वरिष्ठ नागरिक असून त्यांना तिकिटात सवलत मिळायला पाहिजे असेही फडके यांनी सांगितले. देशात रेल्वेस्थानकांच्या सहा कॅटेगरी असून छत्रपती संभाजीनगर स्थानकाचा एनएसजी-२ मध्ये समावेश आहे.