आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला:विठ्ठलने बनवली 5 मिमी लांबीची तोफ, 140 मिलिग्रॅमच्या तोफेची लिम्का बुकमध्ये करणार नोंद

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचा शेतकरी सुपुत्र विठ्ठल गोरे याने जगातील सर्वात लहान ५ मिमी इंच लांबीची आणि १४० मिलिग्रॅम वजनाची तोफ बनवली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने लिम्का बुकमध्ये नोंद करण्याचा मानस त्याने “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. शिवजयंतीनिमित्त विठ्ठलने २ फूट लांबीच्या ५ तोफांची निर्मिती केली होती. त्याचे सर्वत्र कौतुक झाले. यापेक्षा लहान तोफ बनवता येईल का, अशी विचारणा झाल्यावर त्याने १० इंच लांबीच्या तोफा बनवल्या, तर एक पाऊण इंच लांबी म्हणजे ५ मिमी आणि वीस (१४० मिलिग्रॅम) ग्रॅम वजनाची तोफ बनवली. यापूर्वी अशी लहान तोफ कधी व कुणी बनवली याचा गुगलच्या माध्यमातून शोध घेतला असता राजस्थानातील जयपूर येथील कुंजबिहारी सोनी यांनी १९७१ मध्ये सर्वात लहान तोफ बनवल्याचे आढळले. जगातील सर्वात लहान उडवता येण्यासारखी तोफ हर्ने हल यांनी बनवलेली असल्याची नोंद गिनीज बुकमध्ये आहे. त्यापेक्षा लहान तोफ बनवून विठ्ठलने विक्रम रचला आहे. पण याची जागतिक पातळीवर नोंद करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने अाधी लिम्का बुकमध्येच नोंद करणार असल्याचे विठ्ठलने सांगितले.

सोनी, हर्ने यांचा विक्रम मोडला
जयपूरचे कुंजबिहारी सोनी यांनी भारतातील सर्वात लहान तोफ बनवली होती. ती ११ मिमी लांब, ८ मिमी उंच, १.२ ग्रॅमची आहे. हर्ने हल यांची तोफ ६ मिमी लांब, ३ मिमी उंच आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. विठ्ठलने या दोघांपेक्षा लहान तोफ बनवली आहे. पितळ व तांब्याचा वापर करून ५ मिमी लांब, रुंदी ३.५ मिमी, उंची २.७ मिमी आणि वजन १४० मिलिग्रॅम, बॅरल ०.९६ मिमी व्यासाची ही तोफ आहे.

बातम्या आणखी आहेत...