आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गावर शनिवारी (१७ डिसेंबर) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास टायर फुटल्याने भरधाव कार मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरेजवळ कठड्यावर धडकली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून कारचा चुराडा झाला आहे. समृद्धी महामार्गावर शनिवारी दुपारी वाशिम जिल्ह्यात २०६ किलोमीटरवर टायर फुटल्यामुळे कार कठड्याला धडकली. या अपघातात चालक अनीश कुलकर्णी (रा. नाशिक) यांच्यासह ओमकार कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी (नाशिक), रजनी बहाद्दूरकर (नागपूर), शांताराम बहाद्दूरकर नागपूर हे ५ जण जखमी झाले. भरधाव कार अनियंत्रित झाल्याने कार कठड्यावर आदळली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर तीन ते चार अपघात झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.