आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी:दहीहंडीसाठी आज रात्री 5 रस्ते वाहतुकीस बंद; एसआरपीएफ कंपनीचा बंदोबस्त तैनात

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत आहे. कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, बजरंग चौक येथे प्रचंड गर्दी उसळू शकते. म्हणून ९० पोलिस अधिकारी, १२५१ कर्मचारी, ५०० होमगार्ड, एसआरपीएफ कंपनीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय शुक्रवारी सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत पाच प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.

साक्षी मंगल कार्यालय ते टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर ते टीव्ही सेंटर, शरद टी ते टीव्ही सेंटर, आय. पी. मेस ते टीव्ही सेंटर.

एचडीएफसी बँक एटीएम चौक ते कॅनॉट, बॉम्बे स्टेशनरी ते कॅनॉट, वाय झेड फोर्ड शो रूम ते कॅनॉट, बाळासाहेब सानप यांचे कार्यालय ते कॅनॉट, सिडको कार्यालयाशेजारील रस्ता ते कॅनॉट. पतियाळा बँक ते गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील आदिनाथ चौक ते गजानन मंदिर चौक, त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर.

पंचवटी ते कोकणवाडी चौक, विट्स हॉटेल ते कोकणवाडी चौक, एसएससी बोर्ड ते कोकणवाडी चौक, कोर्ट सिग्नल ते कोकणवाडी. पैठण गेट ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी, बाराभाई ताजिया चौक ते गुलमंडी, सिटी चौक ते गुलमंडी, औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया.

बातम्या आणखी आहेत...