आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्य चांगलाच तळपू लागला आहे. त्यामुळे गत १८ दिवसांत रविवारी (३ एप्रिल) पाचव्यांदा कमाल तापमान चाळीस अंश सेल्सियस उच्चांकी पातळीवर गेले होते. गतवर्षी या अठरा दिवसांत एकदाही पाऱ्याने चाळिशी ओलांडली नव्हती. म्हणजेच यंदा तापमान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी जास्त राहण्याची प्रथमच नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. उन्हाच्या चटक्यांनी अंग पोळून निघत असल्याने जीव कासावीस होत आहे. मक्रर संक्रांतीपासून लहान दिवस सरून मोठ्या दिवसला सुरुवात होते व गुढीपाडव्यापासून दिवस मोठा मोठा होत जातो. तर रात्र लहान होते. सूर्य उत्तरेकडे सरकतो व पृथ्वी जवळ येते. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. रविवारी कमाल तापमान प्रथमच ४०.६ अंशांवर गेल्याची नोंद झाली. म्हणजेच सर्वाधिक उष्ण दिवस ठरला.
शहराबाहेर जाताना काळजी घ्यावी
अकोला, बुलडाणा, यवतमाळ शहराचे तापमान सरासरी पेक्षा ४ अंशांनी तर अमरावती, परभणी, औरंगाबाद ३ तर उर्वरित शहराचे तापमान १ ते २ अंशांनी जास्त होते. त्यामुळे शहराबाहेर जाताना प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी.
पाच दिवसांतील उच्चांकी तापमान
दिनांक कमाल
१८ मार्च ४० डिग्री
२८ ४०.०
३० ४०.०
दिनांक कमाल
०२ एप्रिल ४०.२ डिग्री
०३ ४०.६ डिग्री
बीड बायपास रोड येथे भरदुपारी केबलचे काम करणारा कामगार उष्णतेमुळे लाही लाही झाल्याने तोंडावर थंड पाणी मारताना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.