आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर:‘आयएमए’ उपचारासाठी घेणार ग्रामीण भागातील 5 गावे दत्तक

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन सेवा द्याव्यात, यासाठी ‘आयएमए’ पाच गावे दत्तक घेणार आहे. संबंधित गावांतील नागरिकांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. तपासणी आणि उपचार संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहेत, अशी माहिती ‘आयएमए’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. यशवंत गाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीत २०२३-२४ वर्षासाठी अध्यक्षपदी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गाडे व सचिवपदी डॉ. अनुपम टाकळकर यांची निवड करण्यात आली आहे. याच निवडणुकीत पुढील वर्षाचे नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. उज्ज्वला दहिफळे यांची निवड करण्यात आली.