आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडींसाठी जेवणाची व्यवस्था:शहरात दोन ठिकाणी सामूहिक तुळशी विवाहात 50 जोडपी होणार सहभागी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी उत्सवानंतर सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणाऱ्या तुळशी विवाहाला शनिवारपासूून सुरुवात होणार आहे. शहरात शनिवार आणि रविवारी असे दोन सामूहिक विवाह सोहळे होणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात यंदा चारच दिवस विवाह सोहळा करता येणार आहे, असे ज्योतिष्यांनी सांगितले.

बन्सीलालनगरातील अष्टविनायक एन्क्लेव्हमध्ये शनिवारी औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने तर कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने कुलस्वामिनी लॉन्सवर रविवारी सायंकाळी तुळशी विवाह होणार आहेत. माहेश्वरी संघटनेच्या सोहळ्याला श्रीकांत मुंदडा यांच्या घरातून कृष्णमूर्तीची वरात निघेल. २०० ते २५० वऱ्हाडी यामध्ये सहभागी होतील.कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाह लावले जातात. विष्णू यांना सर्वाधिक प्रिय असलेल्या तुळशीशी त्यांचा विवाह लावला जातो. शहरातही घराघरात तुळशी विवाह होणार आहे. तुळशीच्या विवाहानंतर हिंदूंमध्ये विवाहांना सुरुवात होते.

अशी करावी विवाहाची तयारी ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांच्या मते, या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी व्यतिपात योग असल्याने तुलसी विवाह करता येणार नाही. १ विवाहाची वेळ : सायंकाळची असते. २ विवाहाची तयारी : तुळशीवृंदावन सारवून स्वच्छ करावे. वृंदावनास रंग लावून स्वस्तिक काढावे. त्यावर ‘राधा - दामोदर प्रसन्न’ असे लिहावे. चिंचा, आवळे ठेवावेत. ऊस खोचून ठेवावा. उसाला वधूच्या मामाचा मान आहे. ३ पूजा साहित्य : हळकुंडे, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, हळद-कुंकू, नारळ, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, फळे, लाह्या, बत्तासे आदी.

कुलस्वामिनीतर्फे रविवारी विवाह
सिडको एन-६ येथील कुलस्वामिनीच्या सोहळ्यात १०० जणांची उपस्थिती राहील. कुलस्वामिनीचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे म्हणाले, यंदा इतर उत्सवाप्रमाणेच तुळशी विवाहाचा उत्साह जोरदार आहे.

बातम्या आणखी आहेत...