आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० परिषदेचे आयोजन औरंगाबादच्या पथ्यावर पडले आहे. कारण यानिमित्ताने राज्य शासनाकडून मनपाला शहर सुशोभीकरणासाठी ५० कोटींचा निधी मिळणार आहे. फेब्रुवारीत जगभरातील ४० देशांचे एक हजार पाहुणे शहरात येणार आहेत. यानिमित्ताने भारतातील वेगवेगळ्या शहरात बैठका, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. फेब्रुवारीत जगभरातील ४० देशांचे एक हजार पाहुणे शहरात येणार आहेत. परदेशी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळातील सदस्य शहरातील काही मोठ्या हॉटेलांमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे विमानतळापासून या हॉटेलपर्यंतच्या रस्त्यांचे सुशोभीकरण, डागडुजी आदी कामे महापालिकेकडून केली जाणार आहेत. त्यासाठी आता राज्य सरकारने हा निधी मंजूर केला आहे.
कामांवर खर्च हाेणार निधी {मुख्य रस्त्यावर व्हर्टिकल गार्डन उभारणे व हरितपट्ट्यांची कामे, कारंजे तयार करणे : ५ कोटी {हेरिटेज साइट्स, उड्डाणपूल, प्रमुख इमारती, वाहतूक बेटांवर आकर्षक रोषणाई करणे : ५ कोटी {शहरातील रस्त्यांवरील भिंती, पूल, उड्डाणपुलांची आकर्षक रंगरंगोटी करणे : ५ कोटी {रस्त्यालगतच्या उद्यानांचा विकास, सुशोभीकरण, दुभाजकात झाडांची लागवड : ५ कोटी { जी-२० शिष्टमंडळ प्रवास करणार आहे ते रस्ते, दुभाजक, चौकांची दुरुस्ती, सुशोभीकरण, रोड फर्निचर : ३० कोटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.