आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी:कला, क्रीडा गुणांच्या अर्जासाठी 50 रु. शुल्क

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रीय कला, चित्रकला, विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परिक्षेत अतिरिक्त गुण दिले जातात. तसा प्रस्ताव शाळा व महाविद्यालयांकडून विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवला जातो. त्यामुळे त्याच्या छाननीसाठी आता फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून प्रती विद्यार्थी ५० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीत बारावी, तर मार्चमध्ये दहावीची परीक्षा सुरू होईल. यात शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य), चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासाठी शाळांकडून विभागीय मंडळांना प्रस्ताव प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्येक प्रस्तावाची छाननी होते. त्यात काही त्रुटी असल्यास त्या संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पत्रव्यवहाराद्वारे कळवले जाते. त्यानंतर यादी अंतिम करून ग्रेडनुसार गुण दिले जाते. वाढती संख्या लक्षात घेऊन प्रस्तावाच्या छाननीसाठी अधिकचे कर्मचारी लागतात.

बातम्या आणखी आहेत...