आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुकुंदवाडी येथील मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या नववी आणि दहावीच्या ५० विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात बुधवारी सकाळी १०:३० वाजता जालना राेडवरील एका कपड्याच्या दुकानात गेल्या. त्यांनी दुकानात जाऊन साड्यांबाबत सर्व माहिती जाणून घेतली. या वेळी तुम्ही एकदम खूप जास्त ग्राहक आल्यावर काय करता, एखाद्या ग्राहकाने नेलेला माल परत करायला चिडूून आणला तर तुम्ही त्याला कसे हँडल करता, अशा एकाहून एक प्रश्नांच्या फैरी विद्यार्थिनींनी दुकानदारावर झाडताच कर्मचारीदेखील अवाक् झाले.
औचित्य होते, नववी-दहावीच्या वर्गातील मुलींना रिटेल मार्केटिंगविषयी माहिती व्हावी. त्यासाठी शाळेने मुख्याध्यापक डॉ. संपत इधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक क्षेत्रीय भेट आयोजित केली हाेती. विद्यार्थिनींना रिटेल हा विषय अभ्यासासाठी आहे. तो फक्त पुस्तकातून न िशकवता त्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा, यासाठी ही भेट आयोजित केल्याचे विषय शिक्षक संदीप मुर्तडकर यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थिनींनी साड्यांची विक्री कशी केली जाते, ग्राहकांशी कसा संवाद साधता, जर कुणी माल परत करायला आले तर त्यांच्याशी कसे बोलता, अनेक वेळा दाखवलेले कपडे ग्राहकांना आवडत नाहीत, अशा वेळी तुम्ही काय करता, ऑनलाइन पेमेंट कसे घेता आदी प्रश्न मुलींनी दुकानमालक गौरवकुमार केलाणे, हर्षल केलाणे यांना विचारले. त्यावर मालकांनी नि:संकाेचपणे उत्तरे देत सर्व प्रश्नांचे निराकरण करत विद्यार्थिनींचे चॉकलेट देऊन स्वागतही केले. या वेळी सचिन गायकवाड, अमोल गवारे, मंगल निकम, विनया शामरुळे, सुरेखा अक्षे, विजयमाला निमगावकर आदींनी परिश्रम घेतले.
दुकानदाराचे परिश्रम समजले ^या वेळी दुकानात आलेल्या ग्राहकांशी कशा पद्धतीने संवाद साधावा, याची माहिती देण्यात आली. आपण एखाद्या दुकानात गेल्यावर खूप कपडे बघतो. पण, ते पुन्हा ठेवताना किती कसरत करावी लागते हेे समजले. -साक्षी खेळकर, विद्यार्थिनी
मार्केटिंगची माहिती मिळाली एखादी वस्तू विकायची असेल तर त्यासाठी किती लोक काम करतात, त्यासाठी कसे मार्केटिंग करावे लागते, याची माहिती देण्यात आली. -श्रद्धा गाडेकर, विद्यार्थिनी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.