आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांच्या पैशातून प्रायोजकत्व:पर्यावरण संवर्धनाशी काडीमात्र संबंध नसताना आशिष शेलारांच्या ‘जाणता राजा’ला 50 लाखांची मदत

महेश जोशी | छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत 14 ते 19 मार्चदरम्यान झाला होता महानाट्याचा प्रयोग
  • शेलार यांनी केली होती राज्य शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण अभिप्रेत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यास अपवाद ठरले आहे. मंडळाने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या "जाणता राजा' महानाट्याला तब्बल ५० लाखांची मदत केली. पर्यावरणाशी नाटकाचा काडीमात्र संबंध नाही. तरी सामान्यांच्या कराच्या पैशातून प्रायोजकत्व स्वीकारून शासनाने शेलारांना मोठे केले.

दरम्यान, शेलारांना प्रायोजकत्व देण्याऐवजी सांंस्कृितक खात्याने हे आयोजन करायचे होते, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. साहित्य संमेलन आणि कणेरी मठातील पंचमहाभूत लोकोत्सवालाही मंडळाने भरभरून मदत केल्याचे समोर आले अाहे. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील "जाणता राजा' आशियातील महानाट्य आहे. ५ मजली सेटवर २५० वर कलाकार काम करतात. शेलार यांच्या वतीने १४ ते १९ मार्च २०२३ दरम्यान शिवाजी पार्कवर हा प्रयोग विनामूल्य आयोजित करण्यात आला. प्रयोगाला रोज १० हजारांहून अधिक रसिक येत. हा खर्च पेलण्यासाठी शासनाने प्रायोजकत्व देऊन सहकार्य करण्याची विनंती करणारे पत्र शेलार यांनी २० फेब्रुवारीला पाठवले. नाटकाचे प्रयोग संपल्याच्या १० दिवसांनंतर शासनाने त्याची दखल घेतली.

मंडळाकडे टोलवला खर्चाचा चेंडू शेलार यांच्या मागणीचा चेंडू शासनाने एमपीसीबीच्या कोर्टात टोलवला. पर्यावरण व वातावरण बदल विभागाचे अवर सचिव संजय संदानशिव यांनी २८ मार्चला शासन निर्णय काढून शेलारांची मागणी मान्य केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे महत्त्व लक्षात घेत मंडळाने प्रायोजकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे जीआरमध्ये नमूद आहे. त्यानुसार ५० लाख रुपये देण्यात आले. पर्यावरण संवर्धनाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांना सहकार्य करणाऱ्या मंडळावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

कणेरी मठासाठी ४ कोटी कोल्हापूरच्या कणेरी मठात २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित पंचमहाभूत लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. मठाच्या ६०० एकरांमध्ये भरवलेल्या प्रदर्शनाला ४० लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. महोत्सवासाठी मठाने शासनाला २.९२ कोटी रुपयांची मदत मागितली होती. शासनाने एमपीसीबीला प्रायोजकत्व स्वीकारण्यास सांगितले आणि ४ कोटींची मदत केली. तत्पूर्वी ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान वर्धा येेथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही मंडळाने ५० लाख रुपयांचे प्रायोजकत्व दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनाच्या आदेशाचे पालन कोणत्याही कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेताना त्यातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, बॅकड्रॉपवर सहप्रायोजक म्हणून मंडळाचे नाव टाकणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रम नसतानाही काही कार्यक्रमांना आम्ही मदत करतो. शासनाचे आदेश असल्यास त्याचे तंतोतंत पालन करतो, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

शासनानेच आयोजन करायचे होते ^हे आयोजन केल्याबद्दल आशिष शेलार यांचे अभिनंदन. मात्र, वैयक्तिक आयोजनाचा खर्च शासनावर लादणे चुकीचे आहे. मंडळाने पर्यावरणाशी संबंध नसताना प्रायोजकत्व कशासाठी घेतले? शेलारांनी स्वत: खर्च उचलायचा किंवा सांस्कृतिक खात्यानेच आयोजन करायचे होते. -अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद