आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष निधी:ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी 50 लाख खर्च ; जी-20 परिषदेची शहरात जोरदार तयारी सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या अनुषंगाने औरंगाबाद शहरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने महापालिकेला ५० कोटी रुपयांचा विशेष निधी दिला असून त्यातून सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. सिडको-१ येथील उद्यान व जालना रोडवर छोट्या स्वरूपाचे ग्लो गार्डन विकसित केले जाणार आहे. त्यावर सुमारे ५० लाखांचा खर्च होणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी दिली.

भारतात फेब्रुवारी २०२३ मध्ये जी-२० परिषद होणार आहे. या परिषदेत सहभागी देशांच्या महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मनपाला अत्यावश्यक कामांसाठी विशेष निधी दिला आहे. त्यातून रस्ते-दुभाजकांचे सुशोभीकरण, दुभाजकांमध्ये वृक्षारोपण यांसह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार उद्यान विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सिडको-१ येथील उद्यानात ग्लो गार्डन विकसित केले जात आहे. जालना रोडवर हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडरसमोरील दुभाजक विकसित करून तेथेही ग्लो गार्डन विकसित केले जात आहे. या दोन्ही गार्डनवर सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. कृत्रिम झाडांवर रंगीबेरंगी प्रकाश योजना करून ग्लो गार्डन तयार केले जाते.

डॉ. कराड यांचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित केंद्र शासनाच्या निधीतून शहरातील कलाग्राम परिसरात दोन एकरांवर ग्लो गार्डन विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महापालिकेच्या प्रशासकांना दिला होता. मात्र, त्यावर अद्याप कुठल्याच हालचाली झालेल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...