आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांची गर्दी:घाटीच्या सुरक्षेसाठी आणखी 50 कर्मचाऱ्यांची गरज ; प्रशासनाची पालकमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीत सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे. त्याचा फटका गर्दीचे व्यवस्थापन करताना बसत आहे. घाटीत दररोज दहा हजारांपेक्षा अधिक लोकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे दररोज येणाऱ्या नातेवाइकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी वाढीव सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. घाटीत सध्या सुरक्षा रक्षकांच्या दोन संस्थांच्या माध्यमातून ११९ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाढ करण्याची मागणी घाटी प्रशासनाने पालकमंत्र्यांकडे केली आहे.

घाटीत सुरक्षा व्यवस्था कमी असल्याने अनेकदा हाणामारीचे प्रकार घडतात. डॉक्टरला होणाऱ्या मारहाणीमुळे डॉक्टर संपावर गेल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे. निवासी डॉक्टरांतर्फे वारंवार सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे घाटी प्रशासनाने पालकमंत्र्यांकडे वाढीव सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.अपघात विभाग, बालरोग विभाग, प्रसूती विभाग, आयसीयू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. किमान आणखी ५० सुरक्षा रक्षक वाढवून देण्याची मागणी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...