आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​झुलेलाल जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन:दोनशे कुटुंबे राहत असलेल्या सिंधी कॉलनीत 50 जणांनी केली स्वच्छता

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ४५० सिंधी कुटुंबे वास्तव्यास आहेत. यापैकी २०० कुटुंबे सिंधी कॉलनीत राहतात. या ठिकाणी सिंधी समाजाचे संकुलही आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या झुलेलाल जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यातील पहिला उपक्रम स्वच्छता अभियान शनिवारी झाला. यामध्ये ५० सिंधी बंधू-भगिनींनी कॉलनी परिसराची स्वच्छता केली. सकाळी दोन तास हा उपक्रम झाला. या वेळी समाजाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

समाजाचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले, सिंधी समाज तुलनेने कमी संख्येत आहे. शिवाय संपूर्ण समाज व्यापारात आहे. मात्र, झुलेलाल हे आमचे आराध्य दैवत आहे. या वेळी प्रत्येक जण वेळ काढून समाजासाठी एकत्र येतो. उत्साहाने उपक्रमात सहभागी होतो. या वेळी सिंधी समाज अध्यक्ष चिरंजीलाल बजाज, कार्याध्यक्ष राजू तनवाणी, सेवक राम तोलवानी यांनी मार्गदर्शन केले.आज थॅलेसेमिया शिबिर: समाजातर्फे रविवारी (१९ मार्च) सकाळी थॅलेसेमिया तपासणी शिबिर होईल, सायंकाळी फन फेअरचे आयोजन केले आहे, असे अजय तलरेजा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...