आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्याचा मुहूर्त ठरला:दसऱ्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार ; नितीन पाटील यांनी केली घोषणा

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोसायट्यांवर अनिष्ट तफावतीचा कोट्यवधी रुपयांचा भार टाकून बँक नफ्यात असल्याचे दाखवले जाते. गत वर्षात १४३ कोटी रुपये भर पडून एकूण तफावत ५७२ कोटींवर जाऊन पोहोचली. याला जबाबदार कोण, असा प्रश्न संचालक कृष्णा डोणगावकर यांच्यासह काही सभासदांनी जिल्हा बँकेच्या सभेत उपस्थित करून अध्यक्ष नितीन पाटील यांना कोंडीत पकडले. यावर उत्तर देताना हा देशपातळीवरच आहे. दरम्यान, नियमित कर्जफेड करणाऱ्या ५० हजार शेतकऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तापासून ५० हजार रुपये खात्यात जमा केले जाणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

पाटील म्हणाले की, विदर्भ, कोकण, हरियाणा, पंजाब आदी सर्वच ठिकाणी हा प्रश्न आहे. केंद्र व राज्य सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. आपण ही रक्कम भरू शकत नाही. तसे केले तर बँकच बुडून जाईल. यावर डोणगावकर म्हणाले, सोसायट्यांना तोट्यात दाखवून बँक नफ्यात कशी काय दाखवत आहात, या प्रतिप्रश्नावर पाटील हतबल होत म्हणाले की, हा अतिशय क्लिष्ट प्रश्न असून आरबीयचे प्रमाणपत्र रद्द होऊ शकते. त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली होती. आता बोर्ड व समितीत यावर निर्णय घेऊ. केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवू. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना हा विषय समजावून सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतरही सोसायट्या, शेतकरी जगला पाहिजे म्हणून हा विषय ५० पेक्षा अधिक सभासदांनी नामंजूर केला. त्याला कडाडून विरोधही दर्शवला.

४९५.८७ कोटींचे कर्ज वाटप, एनपीए १० टक्क्यांपर्यंत
रामकृष्ण जलसिंचन योजनेसाठी ६४ कोटी, २४१९.४४४ कोटी ठेवी असून २३ मार्च २३ पर्यंत ३ हजार कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. एनपीए ९.९८ टक्के असून तो ५ टक्क्यांपर्यंत खाली आणून अ गटात बँकेचा समावेश करण्याचा प्रयत्न, २०२१,२२ आर्थिक वर्षांत ६.१२ कोटी निव्वळ नफा, ४९५.८७ कोटी रुपये कर्ज वाटप केल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले.