आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्ट-अप कल्पनांना 'मसिआ'ची उभारी:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर व टाटा टेक्नॉलॉजीज सीएसआर यांच्यात सयुंक्त उपक्रमाने यांनी नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च इनोव्हेशन आयडिया ऍक्सिलरेशन नुकताच झाला. यात विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अप कल्पनांना मराठवाडा अससोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (मसिआ) कडून 50 हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे.

उपक्रमात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना हे अर्थसाह्य मिळाले.

यामध्ये विद्यार्थ्यांची शेती उपयुक्त अशी स्टार्टअप कल्पना आहे, त्यात स्वयंचलित भाजीपाला लागवड यंत्र याचा समावेश असून या यंत्रणेने टमाटे, मिर्ची, वांगी यासारख्या रोपांची लागवड करता येते. जी शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त आहे. ही यंत्रणा कमीतकमी मनुष्यबळ आणि कमीतकमी वेळेत जास्तीचे भाजीपाला रोपांची लागवड करतात. या यंत्रणेने शेतीमधील दोन रोपांमधील अंतर निर्धारित करता येते. तसेच कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. ट्रेमधील रोपांची लागवड ही स्वयंचलीतरित्या जमिनीमध्ये होते.

स्टार्टअप कल्पनेवरती काम करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैभव जाधव (कर्णधार), रवींद्र घाटे, शेख दानियाल, गुफरान अन्सारी, राणी राठोड, निकिता राठोड, रिया धूत, धोरती कोलते, अल्ताफ शेख, रोहन मुरदारे, त्यांना डॉ. रामचंद्र चोपडे (हेड ऑफ डिपार्टमेंट, मेकॅनिकल), प्रा. दीपक पवार (टि .पी.ओ ), डॉ. देवेंद्र भुयार (हेड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग ) एस. बी. कुलकर्णी (ट्रैनिंग हेड), सत्या प्रवीण (हेड ऑफ सि. टी. एस. ई ), प्रा. सचिन लहाने यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमात मराठवाडा अससोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (मासिआ ) ऍग्रीकल्चर टीम अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष अनिल पाटील, भगवान राऊत, टाटा टेक्नॉलॉजीकलचे सिद्धार्थ यावलकर, आयईपीसीचे इरादत खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सह तंत्रज्ञान क्षेत्रातील जेष्ठ मान्यवरांच्या पॅनलनें कल्पनांची अंतिम निवड केली आहे. विद्यार्थी सी. एस. एम. एस. एसच्या इनोवेशन अँड रिसर्च सेंटर येथे त्यांच्या स्टार्टअप कल्पनांवर आधारित प्रकल्पाची निर्मिती करतील. यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पदमाकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...