आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी लोकसहभागातून प्रोझोन मॉल ते कलाग्राम, संभाजी महाराज पुतळा परिसर, कमल तलाव, आरएफ कॉलनी, सातारा परिसर, दमडी महल आणि डिव्हाडर स्पेसमध्ये एकूण १२ हजार रोपांची लागवड करण्यात अाली. एकूण २६ हजार ८०० चे उद्दिष्ट असून प्रत्यक्षात ५० हजार वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी दिली.
यंदा मनपाला २६ हजार ८०० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने रविवारी सकाळी ९ वाजता प्रोझोन मॉल ते कलाग्राम दोन्ही बाजूने, टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर, कमल तलाव, आरेफ कॉलनी, सातारा परिसरातील खुल्या जागेवर आणि दमडी महल, डिव्हायडर स्पेसमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. दिवसभरात विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, सेवाभावी संस्था, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने १२ हजार वृक्षांची लागवड करून ५० टक्के उद्दिष्टाची पूर्तता एकाच दिवशी केली. त्यापुढे जाऊन ५० हजार वृक्षरोपण करण्याचा निर्णयही नेमाणे यांनी जाहीर केला. वड, पिंपळ, उंबर, लिंब, बदाम, गुलमोहर, चाफा यासह विविध ३० पेक्षा अधिक प्रजातींचे वृक्षारोपण केले. तसेच, दुसऱ्या टप्प्यात बीड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार असल्याचे अतिरिक्त मनपा आयुक्त नेमाने यांनी सांगितले.
मान्यवरांचा सहभाग : माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी नगरसेविका अंकिता विधाते, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, कार्यकारी अभियंता भागवत फड, आस्थापना अधिकारी विक्रम दराडे, एस. डी. काकडे, आर. एन. संधा, वाॅर्ड इंजिनियर चांडक, वाघमारे, सांस्कृतिक आधिकारी संजीव सोनार, संजय सुरडकर आदी कर्मचारी, प्राथमिक शाळा अशोकनगर, प्रथमिक शाळा नारेगाव उर्दू मराठीचे विद्यार्थी, नागरिक तर दमडी महल येथे अधिकारी अशोक गिरी, मुकुंद कुलकर्णी, सलीम अली सरोवर ते छत्रपती संभाजी महाराज चौक टीव्ही सेंटर, कमल तलाव येथे वाॅर्ड अधिकारी, वाॅर्ड इंजिनिअर, कर्मचारी, उदय शालिनी फेलोशिपच्या ५५ विद्यार्थिनी, नागरिकांनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.
लाइफ केअर अॉनिमल वेल्फेअर असोसिएशनतर्फे वृक्षारोपण
लाइफ केअर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, सलोखा प्रस्थापन संस्था व सम्राट अशोक महिला सेवाभावी संस्था सहकार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खाम नदीवर झाडांना आळे करणे, खत घालणे व मृत झाडांच्या जागी नवीन झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बी. एस. नाईकवाडे, डॉ. पी. के. गुट्टे, मानसिंह पाटील, सचिव जयेश शिंदे, सचिन कुमार, वसीम मिर्झा, मनोज चौतमोल, विशाल पवार, कुणाल पवार, रतन शिंदे, रेणुका काथार, शुभांगी गौरक्षा, अजय सातदिवे, प्रिया लाटे, रोहित लाटे, रेखा शिंदे, ज्योती शिंदे, स्नेहल जगधने, मारियो स्वामी, विजया राजू पोळके, ऋषिकेश पोळके अादींची उपस्थिती होती.
गतवर्षीची ८० टक्के झाडे जिवंत
^गतवर्षी २६ हजार ८०० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात आम्ही ७८ हजार वृक्षारोपण केले. त्यापैकी ८० टक्के झाडे जिवंत आहेत. ५० टक्के तर खाम नदी परिसरात लावली असून वृक्ष चांगले बहरू लागले आहेत. नागरिकांनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन, संगोपन, संरक्षणाची जबाबदारी घ्यावी.
- बी. बी. नेमाने, अतिरिक्त आयुक्त, महापालिका औरंगाबाद
वृक्षारोपण काळाची गरज
^कोरोनाने आपल्याला चांगला धडा शिकवला आहे. ऑक्सिजनसाठी काय हाल झालेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील पर्यावरण समृद्धीसाठी व लाखो नागरिकांच्या आरोग्यासाठी वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. -राजू शिंदे, माजी उपमहापौर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.