आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकाशात अनेकदा वेगवेगळ्या खगोलीय घटना दिसतात. काही प्रत्यक्ष डोळ्यांनी, तर काही विशिष्ट दुबिर्णीतून. गुरुवारी सायंकाळी मात्र शहरातील काही भागांमध्ये आकाशात ट्रेनसारखे चमकणारे ५० ते ६० डबे दिसून आल्याने नागरिकांना आश्चर्य वाटले. प्रत्यक्षात ते इंटरनेट सेवा देणारे उपग्रह असल्याचे समाेर आले. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता आकाशातून एकामागून एक अशा प्रकारचे ५० ते ६० चमकणारे डबे दिसले. त्यामुळे नागरिकांना क्षणभर आकाशातून ट्रेन धावतेय की काय असे वाटले. काहींनी ते यूएफओ (परग्रहवासी) असल्याची चर्चा सुरू केली. अनेकांनी आपल्या नातेवाइकांनाही फोन करून सांगितले. त्यामुळे शहरात सगळीकडे चर्चा सुरू झाली.
११२ नंबरला लावला फोन
आम्ही लहानपणापासूनच धूमकेतू, उल्का अशा विविध घटना पाहत आलो आहाेत. गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता विजय गवई यांना आकाशात लायटिंगसारखे काहीतरी दिसले. त्यांनी मला सांगितले. तेव्हा आकाशात ट्रेनसारखे डबे दिसले. एकीकडे जी-२० परिषद होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही लगेच ११२ क्रमांकावर छावणी पोलिसांना फोन केला, असे नंदनवन कॉलनीतील मुकेश गवई म्हणाले.
ताे उपग्रहांचा समूह
स्टारलिंक हा स्पेस एक्सद्वारे संचालित इंटरनेट उपग्रहाचा समूह आहे. ४७ देशांना उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा प्रदान करते. २०२३ नंतर जागतिक मोबाइल इंटरनेट सेवा देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी २०१९ पासून उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३३०० पेक्षा जास्त लहान उपग्रह सोडले. एकाच वेळी ५० ते ६० लहान उपग्रह सोडले आहेत. ते आकाशात फिरताना ट्रेनसारखे दिसतात. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम अंतराळ विज्ञान केंद्र
ताे उपग्रहांचा समूह
स्टारलिंक हा स्पेस एक्सद्वारे संचालित इंटरने
ट उपग्रहाचा समूह आहे. ४७ देशांना उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा प्रदान करते. २०२३ नंतर जागतिक मोबाइल इंटरनेट सेवा देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी २०१९ पासून उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३३०० पेक्षा जास्त लहान उपग्रह सोडले. एकाच वेळी ५० ते ६० लहान उपग्रह सोडले आहेत. ते आकाशात फिरताना ट्रेनसारखे दिसतात. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम अंतराळ विज्ञान केंद्र
पृथ्वीपासून ३०० किलोमीटर दूर : स्टार लिंक स्पेस एक्स या अमेरिकन कंपनीने सोडलेले हे उपग्रह पृथ्वीपासून ३०० किलोमीटरवर आहेत. सूर्याचा प्रकाश या उपग्रहाच्या पॅनलवर पडतो. ते किरण परावर्तित होतात त्यामुळे उपग्रह चमकतात. दोन सेकंदांना एक किलोमीटर असा त्यांचा वेग आहे. दहा बाय दहाच्या खोलीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे हे उपग्रह आहेत. अशा प्रकारचे उपग्रह सोडणे धोक्याचे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नियम न पाळता हे उपग्रह सोडले जातात. चार वर्षांत अशा प्रकारचे ३०० उपग्रह या कंपनीने सोडले आहेत, असे औंधकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.