आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीर्णोद्धारासाठी 8 कोटी:खंडोबा यात्रेत 500 स्वयंसेवक, 160 वाघ्या-मुरळीच्या जोड्या

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंपाषष्ठीपासून (२९ नोव्हेंबर) साताऱ्यातील खंडोबा मंदिरात यात्रेला सुरुवात होणार आहे. याकरिता ५०० स्वयंसेवकांची फळी सज्ज झाली आहे. १६० ते २०० वाघ्या-मुरळी येणार आहेत. दोन वर्षांनंतर जंगी स्वरूपात यात्रा होत आहे. १ लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतील. महाविकास आघाडी सरकारने ८ कोटींच्या निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास मंजुरी दिली होती, त्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

मंदिरात २४ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता घटस्थापना करण्यात येईल. या वेळी खंडोबाला पुणेरी पगडी, कद नेसवण्यात येईल. भाविक पाच दिवसांचा उपवास ठेवतात. यासोबतच खंडोबा माहात्म्य वाचनही केले जाते. २९ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजता खंडोबाचा अभिषेक होईल. यानंतर चांदीची पगडी, छत्री आणि कंबरपट्टा चढवण्यात येईल. मूर्तीभाेवती सजावट करून सात वाजेच्या सुमारास आरती होईल. ८ वाजता मंदिरातून पालखी निघेल आणि जहागीरदारांच्या वाड्यावर जाईल. या वेळी मोठ्या संख्येने जनसागर लोटतो. सायंकाळी ९.३० वाजता वाड्यातून पुन्हा पालखी मंदिरात आणली जाईल, आरती करण्यात येईल.

सफाई कर्मचाऱ्यांसह पाण्याची व्यवस्था करणार
१० ते १५ सफाई कर्मचारी मंदिराजवळ सफाई करणार आहेत. अग्निशमन दलाची गाडी असेल. एमआयटी ते मंदिरापर्यंतचे बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यात येणार आहेत.-संतोष ठेंगळे, वाॅर्ड अधिकारी

पॅचवर्कला सुरुवात, पण बाकी सुविधा नाही
यात्रेनिमित्त भाविकांना येण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून रस्त्याचे काम करावे, फिरते स्वच्छतागृह करावे, मंदिर परिसरात स्वच्छता, लाइट, एमआयटी ते खंडोबा मंदिरापर्यंत पॅचवर्क, धूळ फवारणी करण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले. २२ नोव्हेंबरला पॅचवर्कला सुरुवात झाली आहे.

पार्किंगची अशी व्यवस्था
वाहनतळांसाठी ४२ हजार दुकानांसाठी ३४ हजारांचे कंत्राट दिले आहे.साहेबराव पळसकर, अध्यक्ष, मंदिर ट्रस्ट

यंदा अभूतपूर्व उत्साह
यात्रेमध्ये भाविक ग्रामीण प्रथेनुसार सहभागी होतात. यंदाचा उत्साह अभूतपूर्व राहील, यात शंका नाही-दिलीप धुमाळ, पुजारी

बातम्या आणखी आहेत...