आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथॉन:मसिआचा मॅरेथॉनमध्ये 500 महिला धावणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज उद्योगनगरीत मसिआ महिला सेलतर्फे महिलांसाठी पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ११ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या मसिआ महिला सेलच्या माध्यमातून वाळूज औद्योगिक परिसरातील विविध कारखान्यांत तसेच इतरही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने ३ व ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

१८ वर्षांवरील मुली आणि महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. वाळूज एमआयडीसी येथील मसिआ कार्यालयासमोरील प्रांगणातून सकाळी ६ वाजता प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात केली जाणार आहे. स्पर्धेत दोन्ही गटात विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे तसेच उत्तेजनार्थ म्हणून खास बक्षिसे दिली जाणार असल्याचे संयोजिका रत्नप्रभा शिंदे यांनी सांगितले. या स्पर्धेत उपस्थित राहण्याचे आवाहन पल्लवी दलाल, जया पवार, सारिका किर्दक, सुलभा थोरात, राजश्री कुलकर्णी, आरती पारगावकर, प्रियंका वाबळे, वर्षा लोया, सुनीता राठी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...