आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मुस्लिम आरक्षण मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते जाणार,  घरापर्यंत पोहोचू - एमआयएमचे शहराध्यक्षनक्षबंदी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष तारेक नक्षबंदी म्हणाले, या मोर्चाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. औरंगाबादेतून किमान पाच हजार कार्यकर्ते हिवाळी अधिवेशनावर धडकतील, अशी अपेक्षा आहे.

२१ डिसेंबर रोजी हा मोर्चा निघणार आहे. नक्षबंदी म्हणाले की,कार्यकर्त्यांपर्यंत मोर्चाचा संदेश देणे. त्यांना काही महत्वाच्या सूचना करणे. त्यांच्या वाहतुकीची तयारी करणे, यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. औरंगाबाद एमआयएमचा बालेकिल्ला असल्याने येथून अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. याशिवाय आम्ही जिल्हा आणि तालुका पातळीवरही संवाद साधणार आहोत. प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे, असा प्रयत्न असल्याने मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल.

बातम्या आणखी आहेत...