आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीम नेशन:शतावरीचा करार करून खरेदी केली नसल्याने ड्रीम नेशन कंपनीस 50 हजार भरपाईचे आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रीम नेशन प्रा. लि. कंपनी व त्यांच्या संचालकांनी शतावरी लागवडीसाठी शेतकऱ्यांशी करार केला. करारापोटी तीन शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपये घेतले. शतावरीचे उत्पन्न झाल्यानंतर संबंधित कंपनीने खरेदी केले नसून, शेतकऱ्यांनी दोन ते अडीच वर्षे सांभाळ केला. याविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागितली. मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व अॅड. संध्या बारलिंगे यांनी कंपनी व ६ संचालकांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या तक्रारदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये ३० दिवसांत देण्याचे आदेश दिले.

मानसिक त्रासापोटी साडेसात हजार, तर कागदपत्रांच्या खर्चासाठी अडीच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.निपाणी गावातील शेतकरी उत्तम गोविंद काकडे, तातेराव सुदा काकडे, कमलाकर काकासाहेब पठाडे यांनी शेतात शतावरीचे पीक घेऊन ड्रीम नेशन प्रा. लि. कंपनीला विकण्याचा करार केला. करारानुसार कंपनीकडे धनादेशाद्वारे ३० हजार रुपये भरले. कंपनी हमीभावाने २४ वर्षांपर्यंत खरेदी करेल, असे म्हटले आहे.

शेतकऱ्यांची जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव
कंपनीचे संचालक विकास विठ्ठल बेंगाडे (पिंपरी चिंचवड), सचिन सोपानराव वैद्य (मुंबई), नीलम विकास बेंगाडे (मुंबई), सुरेश रतन ठाकरे (मुंबई), योगेश बापूराव नलावडे (औरंगाबाद) आदींना नोटीस पाठवली. प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अॅड. आनंद मामीडवार यांच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. कंपनीने करारामधील अटी पाळलेल्या नाहीत, असे नमूद करत नुकसान भरपाई मंजूर केली.

बातम्या आणखी आहेत...