आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय) क्लार्क पदासाठी तब्बल ५००८ जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी मंगळवारपर्यंतची (२७ सप्टेंबर) मुदत आहे. अर्ज वैध ठरणाऱ्या उमेदवारांची पूर्वपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात तर मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे.
एसबीआय बँकिंग कर्मचारी निवड संस्था अर्थात आयबीपीएसच्या माध्यमातून देशभरातील बँकांमध्ये भरती केली जाते. आता आयबीपीएसने एसबीआयमध्ये लिपिकांच्या ५००८ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी किमान वय २० कमाल वयोमर्यादा २८ वर्ष असावे. सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे. तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना फक्त १७५ रुपये द्यावे लागतील. निवड करण्यापूर्वी आधी चाळणी परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यात आधीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. इच्छुकांनी २७ सप्टेंबरपर्यंत ibps.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.