आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान:अन्न वाचवा समितीतर्फे 51 कामगार महिलांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न वाचवा समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील वंचित पण उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५१ कामगार महिलांचा गौरव करण्यात आला. आदर्श महिला प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन बसैयेनगर येथे महिलांना सन्मानित करण्यात आले.पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम महिला करत आहेत. धुणीभांडी, स्वच्छता कामगार म्हणून शहर सुंदर ठेवण्यासाठी धडपड करणाऱ्या व यातूनच संसाराचाही गाडा संभाळणाऱ्या, मुला-मुलींच्या शिक्षणाचा भार उचलणाऱ्या महिलांचे काम दुर्लक्षित करून चालणार नाही याकडे समितीने लक्ष वेधून हा कार्यक्रम घेतला. छावणी बोर्डच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता मालू आणि प्रमुख पाहुण्या डॉ. उज्ज्वला दहिफळे यांच्या हस्ते ५१ महिलांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...